बेताल चित्रे
Friday, June 13, 2008
काही (बे)ताल चित्रे
अघळपघळ - पु.ल.देशपांडेझपताल त्रिताल एकताल इत्यादी भारतीय संगितातील ताल ठारावीक मात्रांमधे बसवले आहेत. त्यामुळे त्या तालांतल्या तालचित्रांना काहीतरी चौकट आहे. प्रस्तुत बेतालचित्रांना कुठलिच मात्रा लागु पडत नाही. परंतु बेताल चित्रांत देखिल एक सुक्ष्म ताल आणि तत्रं दडले आहे. शोधुन काढणारास सापडेल; सापडुन दाखविणारास बक्षिस मात्र नाही. कारण ही चित्रे आसपासचीच आहेत तेव्हा सापडणे अवघड नाही. तालचित्रांत ते कार्य कठीण आहे. बेताल चित्रांत सम सापडणे मात्र बिकट आहे. नाही तरी मी मी म्हणणाऱ्या गवयांना ती कधी वेळेवर सापडणे?दादरापार्श्वभुमी : चाळीतला दादर! (इथे अनेक बेतालचित्रे होतात. त्यांतली काही टिपली आहेत)डोळे फुटले का?सांभाळून बोला!तुम्ही सांभाळुन चाला -सांभाळूनच चालतोयमग मी देखिल सांभाळुनच बोलतोय!इतकी कसली मस्ती आलिये तुम्हाला?मग मस्ती काय तुम्हालाच यावी? रेडीयो घेतला म्हणजे काय विमान नाही घेतलं -तुम्ही घेऊन दाखवा!पानवालेसुद्धा घेतात रेडीयोमग पानाचं दुकान काढा! तरी बरं -काय बरं?कंपाउंडर तो कंपाउंडर!खर्डेघाशापेक्षा बरा!बाटल्याभरु कंपाउंडरवेळकाढु कारकुंडा!हातातलं तुप सांडलं, तुझा बाप भरुन देणार का?तुप? खोबरेल तेलाला तुप म्हणतात का तुझ्या जातीत?जात नाय काढशील -काढीन!काढ काढ, माझी काढता येइल, तुझी कशी काढणार?का? काढुन बघ -असली तर काढायची ना -फाट!खल्ल! चष्मा फोडलास भरुन घे माझ्या!फाट!फटओ~य!

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home