EXPERIENCE LA-GRANDE BY HEMANT BORSE

THIS IS MY DAY TO DAY JOURNEY THESE ARE MY WORDS FOR MY WORK

Sunday, June 29, 2008 | 0 Comments









these are the some words that they said
bu we should listen
posted by Hemant Narendra Borse @ 6:34 AM
इन्सुल्टिंग LINES
Saturday, June 14, 2008 | 0 Comments
1। Any similarity between you and a human is purely coincidental!
2। Are you always so stupid or is today a special occasion?
3। As an outsider, what do you think of the human race?
4। I'd like to kick you in the teeth, but why should I improve your looks?
5। At least there's one thing good about your body। It isn't as ugly as your face!
6। Brains aren't everything। In fact, in your case they're nothing
7। Careful now, don't let your brains go to your head!
. I like you. People say I've no taste, but I like you.
9. Did your parents ever ask you to run away from home?
10. If I had a face like yours. I'd sue my parents!
11. Don't feel bad. A lot of people have no talent!
12. Don't get insulted, but is your job devoted to spreading ignorance?
13. Keep talking, someday you'll say something intelligent!
14. Don't you love nature, despite what it did to you?
15. Don't think, it may sprain your brain!
16. Fellows like you don't grow from trees; they swing from them.
17. He has a mechanical mind. Too bad he forgot to wind it up this morning.
18. He has a mind like a steel trap-always closed!
19. You are a man of the world-and you know what sad shape the world is in.
20. He is always lost in thought-it's unfamiliar territory.
21. He is dark and handsome. When it's dark, he's handsome.
22. He is known as a miracle comic. if he's funny, it's a miracle!
23. He is listed in Who's Who as What's That?
24. He is living proof that man can live without a brain!
25. He is so short, when it rains he is always the last one to know.
26. He is the kind of a man that you would use as a blueprint to build an idiot.
27. How come you're here? I thought the zoo is closed at night!
28. How did you get here? Did someone leave your cage open?
29. How much refund do you expect on your head now that it's empty.
30. How would you like to feel the way you look?
31. Hi! I'm a human being! What are you?
32. I can't talk to you right now; tell me, where will you be in the next 10 years?
33. I don't want you to turn the other cheek; it's just as ugly.
34. I don't know who you are, but whatever you are, I'm sure everyone will agree with me.
35. I don't know what makes you so stupid, but it really works.
36. I could make a monkey out of you, but why should I take all the credit?
37. I can't seem to remember your name, and please don't help me!
38. I don't even like the people you're trying to imitate, if you are at all.
39. I know you were born silly, but why did you have a relapse?
40. I know you're a self-made man. It's nice of you to take the blame!
41. I know you're not as stupid as you look. Nobody could be!
42. I've seen people like you, but I had to pay admission!43. Why are you so stupid today? Anyway, I think that's very typical of you.
44. Do u practice being this ugly?insulting lines
posted by Hemant Narendra Borse @ 9:03 AM
पु.लं. चे किस्से
Friday, June 13, 2008 | 0 Comments
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले। योगायोगाने माहेरचेआणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

**************************************************************************************

माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखतवाचली। त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्नठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरचघाव घातला' .
*******************?************************************************************

वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र। एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,"हा मझा मित्र शरद तळवलकर""हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,हा चांगलाच असरणार!""हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं."अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावातएकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"
*************************************************************************************


पु।लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचाआवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडेभडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरामोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाजखाली येतो की नाही बघ."
*****************************************************************************************


पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे। ते पंधरार्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यानहोत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही."तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^


एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली।बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले। "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले."तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"


************************************************************************************
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात।'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलंह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."

****************************************************************************************

माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका।एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?"लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु।लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>
posted by Hemant Narendra Borse @ 8:29 AM
शिम्पी आणि मी
आजवर कुठल्याही शींप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्षे लोटुनदेखील अजूनही उमगले नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच, फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. ह्या सदगृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सुट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजीइतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा ! तीसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऎवजी लंडनला आपले सूट अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली. सर्कसवाले शिंपीदेखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. (अनुभंवाती हे खोटे ठरले.) मी त्याचा सूट घालून पिकॅडीच्या शिंप्याचा दुकानांपुढून अनेक वेळा गेलो! मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पाद्री समजून हॅट काढून नमस्कार केला! मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, (असतील, पण हे सांगण्याची गरज काय होती?) माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला ‘शेप’ कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते, वगैरे फालतू परिक्षणे केली. अनेक वेळा मला ‘ट्रायल’ला बोलावले. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ‘ट्रायल’ हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले. प्रत्येक ‘ट्रायल’ म्हणजे ट्रायलच होती. दर वेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि ‘नो नो, युवर ट्मी ! ओ ---- युवर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राइट...’ असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडुने रेघोट्य़ा ओढी !

शेवटी एकदाचा सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि.... ‘तुमचे सगळे डिफेक्टस मी खुबीने झाकले आहेत; आता खूशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही’--- असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्याची शांती झाली आणि एकदाचा मी ‘सुट’लो.--(अपूर्वाई)

posted by Hemant Narendra Borse @ 8:26 AM
समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर.. -- पु.ल.
समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर.. -- पु.ल.
"घाबरू नका-मारा बुक्की." मी उगीचच टिचकी मारल्यासारखी बुक्की मारली."असे घाबरता काय? हाणा जोरदार बुक्की! अहो एका बुक्कीत आम्ही सुपारीची भुगटी पाडीत होतो.""वा हॅ हॅ..." माझी क्षीण हास्य. क्षणापूर्वीच तर हा म्हणाला होता की आपल्याला सुपारीच्या खांडाचेसुद्धा व्यसन नाही म्हणून."हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही बंधो. येत्या नारळी पौर्णिमेला पंचाहत्तर पुरी होताहेत-दात पहा."`अहा मज ऎसा दैवहत प्रा आ आ आ आ आणीखचित जगती या दिसत नसे को ओ ओ ओ ओ ओणी.'असे आपल्याला वाटत असते असला हा प्रसंग होता. एका लग्नाच्या मांडवात मी एका टणक म्हाताऱ्याच्या तावडीत सापडलो होतो. हल्ली सहसा मी लग्नाचे सगळे अंक पाहायला जात नाही. पानसुपारीच्या अंकाला तेवढा जातो. कारण दिवसभर मांडवात असंख्य अनोळखी लोकांच्यात वेळ काढायचा म्हणजे धर्मसंकट असते. राशिभविश्यापासून संकर पिकापर्यंत कोण कूठला विषय मांडून बसेल काही सांगता येत नाही. त्यातून आपण वधूसारख्या नरम बाजूचे असलो तर मुकाट्य़ाने सारे काही घ्यावे लागते. मी मात्र पूर्वीपासून एक धोरण सांभाळले आहे. लग्नाच्या मांडव्यात आपल्याशी बोलायला येणारा प्रत्येक इसम हा वरपक्षातला गुप्तहेर असावा अशा सावधगिरीने मी बोलतो. त्यामुळे एकाच मांडवात मी कॉंग्रेस, जनसंघ आणि द्रविड मुन्नेत्र कहढळखगम ह्या सगळ्या पक्षांना आळीपाळीने पाठिंबा दिला आहे. द्रविड मुन्नेत्र नंतरच्या त्या शब्दाचा उच्चार जीभ टाळूला नेमक्या कुठल्या ठिकाणी लावून करायचा असतो हे शिक्षण मला एका गृहस्थाने त्या मांडवातच दिले. हे मराठी गृहस्थ मद्रासला कुठेशी टायपिस्ट म्हणून `एक दोन वर्स नव्हे तर नांपीस वर्स सर्विस करून परतले होते.' बाकी पुण्यातल्या माणसाने मद्रासला टायपिस्टची नोकरी-तीही वट्ट चोवीस वर्स करीत राहणे ही घटना इतीहासात नोंदवण्यासारखी आहे. अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे-म्हणतात ते हेच! असो. हे विषयान्तर झाले. खरे म्हणजे जाणूनबाजून केले. कारण मूळ विषय इतका कडु आहे की त्याकडे वळणॆ नको असे वाटते.भर मांडवात एक पंचाहत्तरी गाठू लागलेला म्हातारा पैरणीची अस्तनी वर करून दंडाच्या बेटकुळीवर दणकून बुक्की मारा असा आग्रह धरून बसला होता. मी एक दोन बुक्क्या माझ्या ताकदीप्रमाणे मारल्या. पण त्याचे समाधान होईना.
posted by Hemant Narendra Borse @ 8:10 AM
बेताल चित्रे
काही (बे)ताल चित्रे
अघळपघळ - पु.ल.देशपांडेझपताल त्रिताल एकताल इत्यादी भारतीय संगितातील ताल ठारावीक मात्रांमधे बसवले आहेत. त्यामुळे त्या तालांतल्या तालचित्रांना काहीतरी चौकट आहे. प्रस्तुत बेतालचित्रांना कुठलिच मात्रा लागु पडत नाही. परंतु बेताल चित्रांत देखिल एक सुक्ष्म ताल आणि तत्रं दडले आहे. शोधुन काढणारास सापडेल; सापडुन दाखविणारास बक्षिस मात्र नाही. कारण ही चित्रे आसपासचीच आहेत तेव्हा सापडणे अवघड नाही. तालचित्रांत ते कार्य कठीण आहे. बेताल चित्रांत सम सापडणे मात्र बिकट आहे. नाही तरी मी मी म्हणणाऱ्या गवयांना ती कधी वेळेवर सापडणे?दादरापार्श्वभुमी : चाळीतला दादर! (इथे अनेक बेतालचित्रे होतात. त्यांतली काही टिपली आहेत)डोळे फुटले का?सांभाळून बोला!तुम्ही सांभाळुन चाला -सांभाळूनच चालतोयमग मी देखिल सांभाळुनच बोलतोय!इतकी कसली मस्ती आलिये तुम्हाला?मग मस्ती काय तुम्हालाच यावी? रेडीयो घेतला म्हणजे काय विमान नाही घेतलं -तुम्ही घेऊन दाखवा!पानवालेसुद्धा घेतात रेडीयोमग पानाचं दुकान काढा! तरी बरं -काय बरं?कंपाउंडर तो कंपाउंडर!खर्डेघाशापेक्षा बरा!बाटल्याभरु कंपाउंडरवेळकाढु कारकुंडा!हातातलं तुप सांडलं, तुझा बाप भरुन देणार का?तुप? खोबरेल तेलाला तुप म्हणतात का तुझ्या जातीत?जात नाय काढशील -काढीन!काढ काढ, माझी काढता येइल, तुझी कशी काढणार?का? काढुन बघ -असली तर काढायची ना -फाट!खल्ल! चष्मा फोडलास भरुन घे माझ्या!फाट!फटओ~य!
posted by Hemant Narendra Borse @ 8:04 AM
काही (बे)ताल चित्रे
अघळपघळ - पु.ल.देशपांडेझपताल त्रिताल एकताल इत्यादी भारतीय संगितातील ताल ठारावीक मात्रांमधे बसवले आहेत. त्यामुळे त्या तालांतल्या तालचित्रांना काहीतरी चौकट आहे. प्रस्तुत बेतालचित्रांना कुठलिच मात्रा लागु पडत नाही. परंतु बेताल चित्रांत देखिल एक सुक्ष्म ताल आणि तत्रं दडले आहे. शोधुन काढणारास सापडेल; सापडुन दाखविणारास बक्षिस मात्र नाही. कारण ही चित्रे आसपासचीच आहेत तेव्हा सापडणे अवघड नाही. तालचित्रांत ते कार्य कठीण आहे. बेताल चित्रांत सम सापडणे मात्र बिकट आहे. नाही तरी मी मी म्हणणाऱ्या गवयांना ती कधी वेळेवर सापडणे?दादरापार्श्वभुमी : चाळीतला दादर! (इथे अनेक बेतालचित्रे होतात. त्यांतली काही टिपली आहेत)डोळे फुटले का?सांभाळून बोला!तुम्ही सांभाळुन चाला -सांभाळूनच चालतोयमग मी देखिल सांभाळुनच बोलतोय!इतकी कसली मस्ती आलिये तुम्हाला?मग मस्ती काय तुम्हालाच यावी? रेडीयो घेतला म्हणजे काय विमान नाही घेतलं -तुम्ही घेऊन दाखवा!पानवालेसुद्धा घेतात रेडीयोमग पानाचं दुकान काढा! तरी बरं -काय बरं?कंपाउंडर तो कंपाउंडर!खर्डेघाशापेक्षा बरा!बाटल्याभरु कंपाउंडरवेळकाढु कारकुंडा!हातातलं तुप सांडलं, तुझा बाप भरुन देणार का?तुप? खोबरेल तेलाला तुप म्हणतात का तुझ्या जातीत?जात नाय काढशील -काढीन!काढ काढ, माझी काढता येइल, तुझी कशी काढणार?का? काढुन बघ -असली तर काढायची ना -फाट!खल्ल! चष्मा फोडलास भरुन घे माझ्या!फाट!फटओ~य!
posted by Hemant Narendra Borse @ 8:04 AM
Links
Subscribe to
Posts [Atom]
Previous Posts
Archives
Visit the Site

Powered by Blogger

MARVEL and SPIDER-MAN: TM & © 2007 Marvel Characters, Inc. Motion Picture © 2007 Columbia Pictures Industries, Inc. All Rights Reserved. © 2007 Sony Pictures Digital Inc. All rights reserved.